यशवंत सहकारी तालुका खरेदी विक्री संघ लि., पन्हाळा हा संघ १९८७ पासून कार्यरत असून पन्हाळा तालुक्यातील व आसपासच्या तालुक्यातील सेवा सहकारी संस्थामार्फत शेतकऱ्यांना लागणारी निरनिराळ्या प्रकारची खते, औषधे, किटकनाशके, तेले याचा रास्त दरात पुरवठा करीत आली आहे. संघाने पन्हाळा तालुक्यात १६ शाखा उघडून शेतकऱ्यांना लागणारी खते सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत सातत्याने पोह्चवित आहे व त्याद्वारे शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. संघ सुरवातीपासून नफ्यामध्ये असून संघाचा लेखापरीक्षण वर्ग सुरवातीपासून सतत 'अ' आहे.
आमचे संस्थेचे तालुक्यात ३ डिपार्टमेंटल स्टोअर, १ पेट्रोल पंप(इंडिअन ऑइल कार्पो. लि.), रत्त्नागिरि व चिपळूण येथील गोकूळ दूध व दुग्धजन्य पदार्थांची वितरण एजन्सि, जैन ईरिगेशन पाईप व इतर मटेरियलच्या वितरण एजन्सि चा समावेश आहे. तसेच संघाचे कळे येथील पेट्रोल पंपास गेली सलग ३ वर्ष पेट्रोल विक्रीमध्ये पुणे विभागात पहिला क्रमांक मिळाला आहे. संस्थेचे स्वतःचे मिश्रखत उत्पादन चालू असून सध्या आमचे दोन ब्रँड(यशवंत मिश्रखत १८:१८:१० व १०:२०:२०) बाजारात उपलब्ध आहेत. संस्थेकडे जवळ जवळ सर्व नामांकित खत कंपन्यांची डिलरशिप आहे. संघाने अलीकडेच जयपी सिमेंट कार्पो. लि. यांची सिमेंटची व जैन ईरिगेशन सिस्टम्स लि. ची डिलरशिप घेतली आहे.
या सर्व व्यवहारांमुळे संस्थेचे संपूर्ण पन्हाळा तालुक्यात तसेच शिरोळ, हातकणंगले, गगनबावडा व करवीर या तालुक्यातील विविध संस्था, सेवा सोसायट्या, शेतीसेवा केंद्र यांच्यासह जवळजवळ ३०० च्या वर संस्थांशी व्यवहार चालू आहेत. संस्थेचे व्यवहाराचे विस्तृत जाळे असल्याने या क्षेत्रातील संस्था सभासद शेतकऱ्यांशी आपुलकीचे व विशासार्ह संबंध प्रस्थापित झालेले आहेत.
संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. अरुण द. नरके व मा. आमदार यशवंत एकनाथ पाटील (दादा) तसेच संघाचे मार्गदर्शक मा. व्हि. एम. ढेरेसो, मा. असि. रजिस्ट्रार यांचे आशीर्वाद व मौल्यवान मार्गदर्शन लाभले आहे.
संघाने सुरवातीपासूनच सर्व आर्थिक व्यवहार शास्त्रशुद्ध पद्धतीने ठेवले आहेत. लेखापरीक्षणामध्ये दर्शविणेत आलेल्या दोषांची पुनरावृत्ती न होईल हे कटाक्षाणे पाहणेत आले आहे. संस्थेचे स्थापनेपासून संघास सतत वैधानिक लेखापरीक्षण वर्ग 'अ' मिळाला असून तो कायम ठेवणेस संघाने यश प्राप्त केले आहे.
संघाचे एकूण कर्मचारी ५९ असून त्यांनी संघाचे काम अत्यंत कार्यक्षमतेने केले आहे. कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेचा व कार्य कुशलतेचा संस्थेला सार्थ अभिमान वाटतो.
© २०१४ यशवंत सहकारी तालुका खरेदी विक्री संघ लि., पन्हाळा. All Right Reserved. Website designed by SHIVSHOBHA INFOTECH